ALERT! H3N2 Virus ने टेन्शन वाढवलं; पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळले ३३ रुग्ण

H3N2 Virus : जीवघेण्या H3N2 Virusचे देशभरात रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. H3N2 Virus ने आता पुणेकरांचीही चिंता वाढवली आहे. कारण पुण्यात H3N2 व्हायरसची 22 जणांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

H3N2 ची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला, थकवा अशी काही लक्षणं जाणवतात. अशा लक्षणांचे बरेच रुग्ण सध्या पुण्यात आढळले आहेत. पुण्यातील अनेक संशयित रुग्णांचे नमुने NIVकडे पाठवण्यात आले आहेत. 

छत्रपती संभाजीनगरमध्येही 11 रुग्ण

छत्रपती संभाजीनगरमध्‍ये देखील 11 रुग्ण आढळून आल्‍याने प्रशासन सतर्क झाले आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून खबरदारीचे पाऊल उचलण्यात येत आहेत. सध्या रुग्णांच्या कोरोना, स्वाइन फ्लू आणि H3N2 या तिन्ही तपासण्या होत आहेत.

सध्या कोणतीही गंभीर परिस्थिती नव्हती. संशयित रुग्णाचा स्वॅब घेतल्यानंतर कोरोना, स्वाइन फ्लू आणि H3N2 ची तपासणी केली जात असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

देशात आतापर्यंतच सात जणांचा मृत्यू

H3N2 व्हायरसमुळे गुजरातमध्ये एका ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात उपचार सुरू होते. यासोबतच या विषाणूमुळे भारतात आतापर्यंत एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळे आरोग्य तज्ज्ञांनी लोकांना खबरदारीचे उपाय अवलंबण्याचे सुचवले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply