Gunratn Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना धक्का! एसटी कर्मचारी बँकेचे १४ संचालक नॉट रिचेबल

Gunratn Sadavarte :  एसटी कर्मचारी सहकारी बँकेचे १४ संचालक कालपासून नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळं गुणरत्न सदावर्ते यांना धक्का बसला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत १९ पैकी केवळ ५ संचालक हजर होते. गैरहजर असलेले सर्वजण सदावर्तेंच्या विरोधात गेल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

दोन दिवसांत घेणार पत्रकार परिषद

टीव्ही ९ च्या वृत्तानुसार, एसटी कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालकांच्या बैठकीत जे १४ संचालक गैरहजर होते ते दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही यात म्हटलं आहे. एसटी कर्मचारी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांनी एकहाती सत्ता काबीज केली होती. तिथंच आता सदावर्ते यांना धक्का बसला आहे.

Aditya Thackeray : “खोके सरकारने गद्दारांच्या ४० मतदारसंघांमध्ये…”, आदित्य ठाकरेंचा खेडमधून राज्य सरकारवर हल्लाबोल

पाच संचालक बाजूनं

गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यपद्धतीवर संचालक नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच १४ संचालक नॉटरिचेबल झाले आहेत तर केवळ ५ संचालकच सदावर्तेंच्या बाजूनं आहेत. त्यामुळं सदावर्ते यांच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply