Gujarat Helicopter Crash : गुजरातच्या पोरबंदरमध्ये ALH हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; तटरक्षक दलातील तिघांचा मृत्यू

Gujarat Helicopter Crash : गुजरातमधील पोरबंदर येथे भारतीय तटरक्षक दलाच्या ALH ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तटरक्षक दलाच्या तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानंतर जखमींना त्वरीत उपचारासाठी पोरबंदरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिघांना मृत घोषित केले.

पीटीआयला दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात पोलिसांनी पोरबंदरमध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दलातील तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळे लागलेली आग विझवण्याचा आणि जखमींना बाहेर करण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांनी केला.

Simhastha Kumbh Mela Nashik : सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये, ७५०० कोटींचा आराखडा; पंचवटीत रामायण काळ झर्रकन नजरसमोर येणार!

या घटनेचा व्हिडीओ सोशल व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अपघातग्रस्त हेलिकॉप्टर दिसत आहे. त्याशिवाय हेलिकॉप्टरमधून काळा धूर येत असल्याचे दिसते. व्हिडीओमध्ये अग्निशमन दल आणि स्थानिक अधिकारी आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तेथे पाहायला मिळते. अपघात कसा झाला, त्यामागील कारण काय आहे याचा तपास तटरक्षक दलाचे अधिकारी करत आहे.

दरम्यान पोरबंदरचे पोलीस अधीक्षक भगीरथ सिंह जडेजा यांनी घटनेची माहिती दिली. त्यांनी ही घटना रविवारी (५ जानेवारी) घडली आहे. ALH ध्रुव हेलिकॉप्टरचे नियमित प्रात्यक्षिक सुरु असताना हा अपघात घडला. यात तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. अपघाताचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. प्राथमिक तपासात हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या बिघाडामुळे हा भीषण अपघात घडला असे म्हटले जात आहे. काही महिन्यांपूर्वी ALH हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. या अपघातामुळे संरक्षण दलातील हेलिकॉप्टर्सच्या अपघाताची मालिका सुरु असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply