Gujarat Floods : गुजरातमध्ये मुसळधार पावसाचे थैमान! जुनागडसह इतर भागात पूर; अनेक वाहने गेली वाहून

Gujarat Floods : गुजरातमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे शनिवारी (२२ जुलै) गुजरातच्या दक्षिण आणि सौराष्ट्र विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळाले, ज्यामुळे शहरी भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.

गुजरातमधील पावसामुळे धरणे आणि नद्यांची पाणी पातळी धोकादायक पातळीपर्यंत वाढल्याने अनेक गावांचा सपर्क तुटला. तसेच राज्यातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि रहिवाशांची गैरसोय झाल्याचे पाहयला मिळाले.

नवसारी आणि जुनागडमध्ये मुसळधार पाऊस झाला, नागरी वस्त्या आणि बाजारपेठांमध्ये पाणी साचले. अधिका-यांनी जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे, धरणात किंवा त्याच्या आसपासच्या भागात जाऊ नये तेसच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीची माहिदी द्यावी असेही प्रशासनाकडून सांगितले जात आहे

Delhi Smuggling Case : दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; १० कोटी रुपयांच्या विदेशी चलनाच्या नोटा जप्त

 

८ तासांत २१९ मिमी पाऊस

जुनागडमध्ये ८ तासांत २१९ मिमी पाऊस झाल्याने शहराला मोठा फटका बसला आहे. त्याठिकाणी उभ्या केलेल्या गाड्या आणि गुरे वाहत्या पाण्यात वाहून गेली, तसेच नागरिकही खोल पाण्यातून सुरक्षित ठिकाणी पोहोचताना दिसले. याशिवाय सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव पथके तैनात करण्यात आली होती.

दक्षिण गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातही मुसळधार पावसाने झोडपले, त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आणि शहरी आणि ग्रामीण भागात पूर आला. नवसारी शहरातील नाल्यात पिता-पुत्र वाहून गेले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, व्यक्तीला वाचवण्यात आले आहे, तर मुलाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नवसारीजवळ वाहतूक कोंडी झाली. अतिवृष्टी असलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये देवभूमी द्वारका, भावनगर, भरूच, सुरत, तापी, वलसाड आणि अमरेली यांचा समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply