Gujarat Bus Accident : सापुतारा घाटात भीषण अपघात; 70 पर्यटकांना घेऊन जाणारी बस कोसळली दरीत

Gujarat Bus Accident : गुजरातमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ सापुतारा येथे मोठी दुर्घटना घडलीय. पर्यटकांना सापुताऱ्यातून सुरतला घेऊन लक्झरी बस सापुतारा घाटाजवळील खोल दरीत कोसळली. या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झालाय. अपघात झालेल्या लक्झरी बसमध्ये सुमारे 70 प्रवासी असल्याचा अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस सूरत चौक बाजारातून ते सापुताराला गेली होती. तेथून परत सूरतकडे येत होती. त्यावेळी ही दुर्घटना झालीय. सापुताऱ्यापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असताना हा अपघात झाला. बस दरीत कोसळण्याची घटना सापुतारा-मालेगाम राष्ट्रीय महामार्गाच्या घाटावर घडलीय.

Kolhapur : 'लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत'; इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा मोठा दावा

अपघाताची माहिती मिळताच सापुतारा पोलीस आणि 108 पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे. पर्यटकांनी भरलेली बस सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सुरक्षा भिंतीला धडकून उलटली, ज्यामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला." बस सापुतारा घाटातून सूरतकडे परतत असताना हा अपघात घडल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिलीय.

अपघातग्रस्त बस रविवारी पहाटे सुरत चौक बाजार येथून पर्यटकांना घेऊन सापुताराला गेली होती. तेथून परत सूरतच्या दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या टेम्पोला वाचवण्याचा प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटले. बस अनियंत्रित झाल्याने लग्झरी बस सुरक्षा भिंतीला धडकत आणि दरीत कोसळली. जखमींना उपचारासाठी नेण्याचे काम सुरू आहे. सापुताराला भेट देऊन पर्यटक सुरतला परतत होते. ही घटना सापुताऱ्यापासून दोन किमी अंतरावर घडली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply