Gujarat Bridge Collapsed: पुलाचं नूतनीकरण करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरसह नऊ जणांना अटक

गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १०० वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेत १३४ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून या पुलाचे नुतनीकरण करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

राजकोट पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ओरेव्हा कंपनीच्या मॅनेजरसह तिकीट खिडकीवरील कर्मचारी आणि पुलाचे व्यवस्थापन करण्याऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ( मंगळवारी ) घटनास्थळाला भेट देणार असल्याचीही माहिती आहे. केवडीया येथे बोलताना त्यांनी घटनेबाबत दुख: व्यक्त केले होते.

रविवारी संध्याकाळी घडलेल्या या भीषण घटनेत १३४ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी होते. या दुर्घटनेत राजकोटचे भाजपा खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांच्याही परिवारातील १२ जणांचा मृत्यू झाला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply