Guillain-Barré Syndrome : मेंदू व्हायरसचं थैमान, २४ पेशंट व्हेंटिलेटरवर; केंद्राचं पथक पुण्यात

Guillain-Barré Syndrome : कोरोनाच्या संकटातून देश सावरत असताना एका नव्या आजारानं डोकं वर काढलंय. पुण्यात मागील काही दिवसांपासून जीबीएस अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजारानं थैमान घातलंय. दिवसेंदिवस या आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ होत चाललीय. आता हा आकडा ७३ वर पोहोचला असून, यामुळे पुण्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. राज्य सरकारनं नागरीकांना तब्येत जपण्याचा सल्ला दिलाय.

आरोग्य विभागाकडून गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रूग्णांबाबत नवी अपडेट जारी करण्यात आलीय. पुण्यात जीबीएस रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून, हा आकडा आता ७३ वर पोहोचला आहे. या पैकी ४४ रूग्ण हे पुणे ग्रामीण भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ४७ पुरुष तर २६ महिला रूग्ण आहेत. तर, २४ रूग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे.

Accident : सोलापूरहून घराकडे निघाले, काळाचा घाला, ३ जणांचा मृत्यू, २ गंभीर

जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सेंट्रल सर्व्हेलन्स युनिटनं दखल घेतलीय. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक पुण्यात पाठवण्यात आलंय. या ७३ रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १६ रूग्ण, ४४ रूग्ण हे पुणे ग्रामीण भागातील आहेत, तर पुणे महापालिका भागातील ११ आणि पिंपरी चिंचवडमधून १५ रूग्णांचा समावेश आहे. तसेच किरकिटवाडीमध्ये १४, तर डीएसके विश्व ८, नांदेड शहर ७ आणि खडकवासलामध्ये ६ रूग्ण आढळले आहेत.

गुईलेन बॅरे सिंड्रोमची बाधा ही कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे झाल्याचं उघड झालंय. दूषित पाणी आणि अन्नातून हा आजार होत असल्याचं समोर आलंय. सुरुवातीला पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि हातापायांना मुंग्या येणे यांसारख्या लक्षणं दिसून येतात. हा सिंड्रोम लहान मुलांमध्ये अधिक वेगानं पसरत आहे. ९ वर्षापर्यंत असलेले १३ रूग्ण तर, ६० ते ६९ वयोगटातील १५ रूग्ण आढळल्याची माहिती आहे. हा आजार लहान मुलं आणि वयोवृद्धांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply