Grampanchayat Election Result 2023 : काटेवाडी अजित पवारांचीच, भाजपविरुद्धच्या लढतीत अजित पवार गटाने मारली बाजी

Grampanchayat Election Result 2023 : अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या बारामतीतील काटेवाडी ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. अजित पवारांचं होम ग्राऊंड असेलल्या काटेवाडीत अजित पवार गटाला सत्ता कायम राखण्यात यश मिळालं आहे. काटेवाडीत भाजप विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना पाहायला मिळाला.

अजित पवार पुरस्कृत जय भवानी माता पॅनलने काटेवाडीतून विजय मिळवला आहे. काटेवाडी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गाव आहे. महायुतीत असूनही अजित पवार गट आणि भाजपने एकमेकांविरोधात पॅनेल उभी केल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष होतं. 

Grampanchayat Election Result : नंदुरबार जिल्ह्याच्या ९ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा; राष्ट्रवादी, काँग्रेसला एकही जागा नाही

बारामती तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीत निवडणूक पार पडली. यातील एक बिनविरोध झाल्यामुळे ३१ ग्रामपंचायतीसाठी काल मतदान झालं होतं. हाती आलेल्या निकालानुसार बारामती तालुक्यातील ३१ पैकी मध्ये २९ ग्रामपंचायती अजित पवार गटाकडे आहेत. तर २ ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे.

अजित पवार गटाने जिंकलेल्या ग्रामपंचायतील

  • भोंडवेवाडी

  • म्हसोबा नगर

  • पवई माळ

  • आंबी बुद्रुक

  • पानसरे वाडी

  • गाडीखेल

  • जराडवाडी

  • करंजे

  • कुतवळवाडी

  • दंडवाडी

  • मगरवाडी

  • निंबोडी

  • साबळेवाडी

  • उंडवडी कप

  • काळखैरेवाडी

  • चौधरवाडी

  • वंजारवाडी

  • करंजे पूल

  • धुमाळवाडी

  • कऱ्हावागज

  • सायबाचीवाडी

  • कोराळे खुर्द

  • शिर्सुफळ

  • मेडद

  • मुढाळे

  • सुपा

  • गुनवडी

  • डोरलेवाडी

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply