Gram Panchayat Election Result 2022: धुळे जिल्‍ह्यातील ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्‍व

धुळे : धुळे जिल्ह्यात १२८ ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे १२० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. याचा निकाल जाहीर होत असून जिल्‍ह्यातील काही ग्रामपंचायत निकाल हाती आला असून यात भाजपचे वर्चस्‍व राहिले आहे.

धुळे जिल्ह्यात १८ ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे आता १२० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक  प्रक्रिया पार पडत आहे. रविवारी झालेल्‍या मतदान प्रक्रीयेनंतर आज निकाल जाहीर होत आहे. यामुळे मतमोजणी ठिकाणी उमेदवारांसह कार्यकत्‍र्यांची गर्दी पहावयास मिळत आहे.

जिल्‍ह्यातील १२० ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होत आहे. यात सकाळी अकरापर्यंत काही ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. यात भाजपचे वर्चस्‍व राहिले आहे. यामध्‍ये भाजप ९, शिवसेना (ठाकरे गट) 2, शिवसेना (शिंदे गट) 2, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 2, इतर 1 असा निकाल आला आहे. तर मनसे व वंचित बहुजन आघाडीला अद्याप खाते उघडता आलेले नाही.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *