Gram Panchayat Election Result : अहमदनगर : इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई सरपंचपदी विराजमान

अहमदनगर : राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत जोरदार लढत पाहायला मिळत आहे. अशातच, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या लढतीत शशिकला शिवाजी पवार विजयी झाल्या आहेत.

शशिकला शिवाजी पवार या किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई आहेत. इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. अपक्ष उमेदवारी दाखल करत इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. शशिकला पवार यांनी सुशीला उत्तम पवार यांचा पराभव केले आहे. शशिकला या 227 मतांनी विजयी झाल्या आहेत. नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत शशिकला पवार या निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.

इंदोरीकर महाराज प्रसिद्ध किर्तनकार आहे. मिश्लिक अंदाजातील किर्तनासाठी इंदोरीकर महाराज प्रसिद्ध आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच त्यांना 'इंदोरीकर महाराज' असं नाव पडलं. इंदोरीकर महाराजांचं मूळ नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख आहे. इंदोरीकर महाराज महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार आणि समाज प्रबोधक आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply