Gram Panchayat Election : बेल्हे : आणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रियांका दाते विजयी

बेल्हे : आणे (ता. जुन्नर) येथे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदी श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार प्रियांका दाते यांनी बहुमताने विजय संपादन केला. दरम्यान श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनलने येथील ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या एकूण ११ जागांपैकी ९ जागांवर विजय पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. आणे येथे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनल व श्री रंगदासस्वामी सर्वमान्य ग्रामविकास परिवर्तन पॅनल या दोन प्रमुख पॅनलमध्ये लढत झाली. श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व प्रशांत उर्फ बाबुशेठ दाते यांनी केले. दरम्यान येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.

येथील सरपंच पदासाठी श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनल च्या अधिकृत उमेदवार प्रियांका प्रशांत दाते, श्री रंगदास स्वामी सर्वमान्य ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या अधिकृत उमेदवार डॉ. श्वेतांबरी दीपक आहेर व अपक्ष उमेदवार म्हणून नंदा विष्णू दाते यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत सरपंचपदी प्रियांका दाते या बहुमताने विजयी झाल्या. श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनलने एकूण ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर विरोधी श्री रंगदास स्वामी सर्वमान्य ग्रामविकास परिवर्तन पॅनलला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान विजयी उमेदवारांचे माजी सरपंच श्रीप्रकाश बोरा यांनी अभिनंदन केले.

या निवडणुकीत श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनलचे ज्योती अजित आहेर, पुष्पलता भास्कर आहेर, सुहास मुरलीधर आहेर, जयराम रंगनाथ दाते, सुनीता सुभाष दाते, अनिता नितीन आहेर, शेखमेहबुब नूरमहमद तांबोळी, ज्ञानेश्वर विष्णू आहेर, प्रियांका विलास दाते हे उमेदवार बहुमताने विजयी झाले. तर श्री रंगदास स्वामी सर्वमान्य ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे संजय लक्ष्मण डोंगरे, लक्ष्मीबाई विकास थोरात या दोन उमेदवारांनी विजय संपादन केला. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ओतूरचे मंडलाधिकारी विजय फलके यांनी जबाबदारी सांभाळली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply