Gram Panchayat Election : आता उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी; बंडखोरीमुळे स्थानिक नेते काळजीत

Gram Panchayat Election : नागपूर जिल्ह्यातील दोनशेवर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख होती. शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अनेक गावातील स्थानिक पॅनेलमध्ये बंडखोरी झाल्याने नेत्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी सुरू झाल्याचे दिसून येते.

शुक्रवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची जास्त गर्दी होती.यावेळी उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यामुळे येथील तहसील कार्यालयातील प्रांगणात नागरिकांची चांगलीच गर्दी उसळली होती. तालुक्याच्या या निवडणुकीतील वाघोडा ग्रामपंचायतीचे सदस्य संख्याबळ १७ आहे.

Dasara Melava : 'आझाद मैदानावर इव्हेंट असेल अन् शिवाजी पार्कवर...'; दसरा मेळाव्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा शिंदे गटावर हल्लाबोल

तर मतदार संख्या ६ हजार ३९५ आहे. या निवडणुकीतील ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. येथे सरपंच पदाच्या जागेसाठी एकूण ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर १७ सदस्य पदांच्या जागेसाठी ५८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. याशिवाय दहेगाव येथील सरपंच पदाकरिता ८ तर १३ सदस्यांसाठी ४८ अर्ज, वाकोडी-सरपंच पदाकरिता ३ तर ११ सदस्यांच्या जागेसाठी ३९ उमेदवारी अर्ज दाखल झालेत.

माळेगाव जोगा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ५ तर ९ सदस्यांसाठी २१, वाकी सरपंच पदासाठी ३ तर ९ सदस्यांच्या जागेसाठी-२१, हत्तीसर्रा येथील सरपंच पदासाठी ६ तर ९ सदस्यांच्या जागेसाठी २० अर्ज आलेत. आजणीशेरडी येथील सरपंच पदासाठी ३ तर ९ सदस्य पदासाठी १८,खुरजगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी ६ तर ९ सदस्यांच्या जागेसाठी १९ अर्ज,खैरी पंजाब - सरपंच पदासाठी ५ तर सदस्यांकरिता १९, शिंदेवानी सरपंच पदाचे ६ तर सदस्य पदांसाठी १९,

सिरोंजी सरपंच पदाचे ४ तर सदस्य पदांसाठी २४, सर्रा- सरपंच पदाचे २ तर सदस्य पदासाठी १५,नागलवाडी-सरपंच पदाकरिता ४ तर सदस्य पदासाठी २१ अर्ज दाखल करण्यात आले.रायवाडी सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदासाठी-१५,उमरी (जा.)सरपंच पदाचे २ तर सदस्य पदाचे १३,गडेगाव सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदासाठी २३, पटकाखेडी सरपंच पदासाठी २ तर सदस्य पदांचे १४,

 

कोटोडी सरपंच पदाकरिता २ तर सदस्यांकरिता १४, इटनगोटी- सदस्य पदासाठी ५ तर सदस्यांकरिता२०,खापा नरसाळा) सरपंच पदासाठी २ तर सदस्यांसाठी १६, जलालखेडा सरपंच पदासाठी २ तर सदस्य पदासाठी १५ उमेदवारी अर्ज भरण्यात आले.

तेलंगखेडी- सरपंच पदासाठी ५ तर सदस्यांसाठी १४, निमतलाई सरपंच पदाच्या जागेसाठी २ तर सदस्यांसाठी १५ अर्ज दाखल झाले. किरणापूर सरपंच पदाकरिता ४ तर सदस्यांकरिता १७, गुमगाव सरपंच पदाच्या जागेसाठी २ तर सदस्य पदाच्या जागेसाठी १० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मल्लिक विराणी व नायब तहसीलदार संदीप डाबेराव यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त कर्मचारी पथकातील दहा बुथांवर उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे कामकाज सुरळीत पार पडले.

 

पारशिवनीत सरपंच पदासाठी ७० अर्ज

१७ ग्रामपंचायत निवडणुकीकरिता होऊ घातली असून सरपंच पदासाठी ७० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ३४४ अर्ज सादर करण्यात आले. उमेदवारी अर्जाची छाननी २३ ऑक्टोबर करण्यात येईल.

तर २५ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येऊ शकणार आहे. त्याच दिवशी दुपारी तीन वाजतानंतर निवडणूक चिन्ह तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पाच नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार असून सहा तारखेला मतमोजणी करण्यात येईल.

 

नरखेड तालुक्यात ११२ अर्ज

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २९ सरपंच पदाकरिता व दोन पोट निवडणुकी करिता ११२ अर्ज तर सदस्या २३१ करिता ५६४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये अंबाडा, सायवाडा व वडविहीरा येथे पोटनिवडणूक होणार आहे. २९ सरपंच पदांपैकी १५ सरपंच पदे महिला आरक्षित आहेत.

यामध्ये सर्वसाधारण महिला पदे-७, अनुसूचित जाती महिला-५ नामाप्र संख्या तीन तर सर्वसाधारण पुरुषांकरिता-७, पुरुष संख्या-१४ आहे. तालुक्यातील भारसिंगी, नरसिंगी, हिवरमठ, साखरखेडा, खापरी केने, थाटुरवाडा, घोगरा, खराशी, खापा घुडण, परसोडी दीक्षित, बानोर पिठोरी, मोगरा, मोहदी धोत्रा,

भिसनूर खरसोली, पिंपळगाव वखाजी, गोधनी गायमुख, रोहना, मोहदी दळवी, जुनोनाफुके, मालापूर, खेडीगोवार गोंदी, पिपळा केवळराम, मोहगाव भदाडे, दिनदरगाव, विवरा, शेंमडा ,मालापूर, वाढोणा, बानोरचंद्र या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार व त्यांचे नेते, गटनेते, समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply