Maharashatra Politics : बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, लोकसभेचे तिकीट मिळणार

Maharashatra Politics : अभिनेता गोविंदा यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर गोविंदा यांना उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश पार पडला.

गोविंदा यांच्या शिवसेना प्रवेशामागं लोकसभेची गणितं असल्याची चर्चा सुरु आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून गोविंदाला लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. यापूर्वी गोविंदा २००४ ते २००९ या काळात काँग्रेसमधून खासदार बनले होते. त्यांनी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली. पण आता पुन्हा पंधरा वर्षानंतर गोविंदाची राजकारणाची दुसरी टर्म सुरु झाली आहे.

Pune : आदित्य ब्रिझ पार्क चा नवा आदर्श दररोज ३५० युनिट्स ची वीज निर्मिती

२०१० पासून २०१४ पर्यंत या १४ वर्षांच्या वनवासानंतर जिथं आहे तिथेच त्याच पक्षात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मी शिवसेनेत प्रवेश करतो आहे. पक्षात आल्यानंतर मी इमानदारीत जबाबदारी पार पाडेन हे मी सर्वांना अश्वस्थ करतो. जगात बॉलिवूडचे जे कलाकार चमकत आहेत त्या बॉलिवूडला जन्म देणारी ही भूमी आहे.

ही संतांची भूमी आहे, साहित्य आणि संस्कृतीला महत्व देणारी ही भूमी आहे. फिल्मसीटी जगात त्या स्तरावर जाऊन पोहोचली आहे. आम्ही सुरुवातीला जी मुंबई पहायचो ती आता जास्त सुंदर दिसते आहे. एकनाथ शिंदे आल्यापासून मुंबईत हवा, रस्ते, सौंदर्यात मोठी भर पडली आहे.

बाळासाहेब ठाकरेंची माझ्यावर चांगली कृपा होती. माझ्या आई-वडिलांपासून बाळासाहेब ठाकरेंशी आमचे चांगले संबंध होते. त्यानंतर आता त्यांच्याच पक्षात मी अशा पद्धतीनं येईल याचा मी कधी विचार केला नव्हता. त्यामुळं आता शिवसेनेत आल्यानंतर मी प्रामाणिकपणे काम करेन, असंही गोविंदा यांनी म्हटलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply