Gopichand Padalkar News : ओबीसी समाज भीतीच्या छायेखाली; गोपीचंद पडळकरांनी चिंता व्यक्त करत सांगितलं कारण

Gopichand Padalkar News :  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर  यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाविषयी चिंता व्यक्त केली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. या संदर्भात अनेक नेते वारंवार तशी वक्तव्येही करत आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे राज्यभरातील ओबीसी समाजामध्ये भीती आहे, अशी काळजी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलीये. 

या भिती पोटीच राज्यभरामध्ये ओबीसी समाजाचे जन जागृतीचे मेळावे घेतले जात आहेत. ओबीसी आरक्षण जनजागृती आणि लढ्यासाठी येत्या सहा जानेवारीला पंढरपुरात ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने येणार असल्याचेही आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी सांगितले आहे.

Crime News : संभाजीनगर हादरलं! कॉफी कॅफेमध्येच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नको ते फोटो व्हायरल करण्याचीही दिली धमकी

काल रात्री पडळकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ओबीसी समाज भीतीच्या छायेखाली असल्याची चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे

 

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. यावेळी दोघांमध्ये मराठा समाजाच्या ओबीसीकरणाबाबत बंद दाराआड चर्चा सुरू झालाी. 20 तारखेला मनोज जरांगे मोर्चाला सुरुवात करत आहेत.

तर, 20 तारखेलाच  ओबीसी समजाला सुद्धा आंदोलनाची परवानगी मिळावी हा चर्चेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. दरम्यान, जरांगे यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला तर आम्हीही मोर्चा तितक्याच तीव्र पद्धतीने काढू अशी प्रकाश शेंडगे यांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply