Gondia Politics : 'देवेंद्र फडणवीस यांनी फोन उचलला नाही म्हणून मी भाजप सोडली'

Gondia Politics : गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तसेच विद्यमान भाजप नेते रमेश कुथे यांची काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी १५ जूनच्या मध्य रात्री कुथे कुटूंबियांची घरी जात भेट घेतली होती. यामुळे गोंदियाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. अशातच नाना पटोले यांनी रात्रीच्या अंधारात खेळलेला खेळ यशस्वी करून दाखवला.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रमेश कुथे यांनी भाजप सोडत असल्याची घोषणा केली आहे. याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले आहेत की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा, विधानसभा, तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत आश्वासन देऊनही मुलाला तिकीट तर दिली नाही. तर दुसरीकडे माझा फोन देखील उचलला नाही. म्हणून मी भाजप सोडत असल्याचं ते म्हणाले आहेत.

Beed Crime News : बीडमध्ये सिनस्टाईल थरार, चोरट्यांनी व्हॅनला बांधून एटीएम पळवलं; पोलिसांनी ६१ किमी पाठलाग करून पकडलं

आगामी विधानसभा निवडणुका पाहता गोंदिया विधानसभेत ओबीसी चेहऱ्याची मागणी होत असताना मागील आठवड्यात नाना पटोले हे गोंदियात एका लग्न समारंभात आले होते. यावेळी त्यांनी कुथे कुटूंबियांची भेट घेतल्याने गोंदियाच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply