Gold At Sea Beach : काय सांगता? समुद्रकिनाऱ्यावर सापडतंय चक्क सोनं; गोळा करण्यासाठी स्थानिकांची तुफान गर्दी

Gold Particles Discovered At Andhra Pradesh : आपल्यापैकी अनेक जण सोन खरेदी करण्यासाठीसोनाराच्या दुकानात जातात. मात्र, आंध्रप्रदेशच्या उप्पदा गावातील नागरिक थेट समुद्र किनाऱ्यावर जात आहेत. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावारी जिल्ह्यातील उप्पदा गावातील समुद्र किनाऱ्यावर स्थानिक लोक सोनं आणि मोती शोधताना दिसून येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून इथे सोनं आणि मोती गोळा करण्याचा प्रकार सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी आंध्रप्रदेशमध्ये नीवर चक्रीवादळाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर येथील काही नागरिकांना समुद्राच्या लाटांबरोबर वाहून आलेले सोन्याचे कण आणि मोती आढळून आले होते. तेव्हापासून येथील वाळूत सोन्याचे करण शोधण्याचा प्रकार सुरू आहे. या वादळामुळे अनेक मच्छिमारांचं नशीबही पालटलं आहे.

Vashi Car Accident: एअर बॅगने घेतला चिमुकल्याचा जीव! पाणीपुरी खायला जाताना झाला कारचा अपघात


विशेष म्हणजे मच्छिमार ज्यापद्धतीने सोनं गोळा करण्यासाठी गर्दी करत आहेत. हे दृष्य पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. सोन्यासाठी प्रसिद्ध झालेलं हे गाव आता पर्यटन केंद्र म्हणून उदयास येणार आहे. आंध्रप्रदेश सरकारने यासंदर्भातील घोषणाही केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेशात आलेल्या चक्रीवादळांमुळे या समुद्र किनाऱ्यावर सोनं आढळून येत आहे. मागच्या काही वर्षात राज्यात बरीच चक्रीवादळ आली आहेत. ज्यात, अनेक घरं आणि मंदिरांच नुकसान झालं आहे. या घटनांमध्ये समुद्राच्या लाटांबरोबर सोन्याचे दागिने आणि मोती वाहून आलेत, ही दागिने कालांतराने वाळूच्या खाली दाबले गेली.
दरम्यान, नुकताच आलेल्या नीवर चक्रीवादळाने वाळू सरकली आहे. त्यामुळे दबलेलं सोनं सुद्धा वर येऊ लागलं आहे. या घटनेनंतर स्थनिकांना सोन्यासारखी चमकनारी वस्तू दिसली होती. त्यांनी जवळ बघितलं तर ते सोन होतं. त्यानतर ही गोष्ट गावात वाऱ्यासारखी पसरली आणि शेकडो स्थानिक मच्छिमार याठिकाणी सोनं गोळ्या करण्यासाठी दाखल झाले. तेव्हापासून अनेक जण इथे सोनं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply