Gokul Dudh Sangh : गोकूळमधील औषध खरेदीत घोटाळा?; लेटरबॉम्बमुळे गोकूळमध्ये खळबळ

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या गोकूळ दूध संघात घोटाळ्याच्या लेटरबॉम्बने खळबळ उडालीय. पण गोकूळला आलेल्या निनावी पत्रात नेमकं काय आहे? याबरोबरच गोकूळमधील आरोप-प्रत्यारोपांचा वेध घेणारा हा विशेष रिपोर्ट.

कोल्हापूर जिल्हाच्या राजकारणात केंद्रस्थांनी असलेल्या गोकूळ दूध संघ घोटाळ्यांच्या आरोपांनी पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गोकूळ दूधसंघाच्या औषध खरेदीत घोटाळा झाल्याचा दावा करणाऱ्या निनावी पत्राने राज्यात खळबळ उडालीय. या पत्रात घोटाळ्याचे धक्कादायक आरोप करण्यात आलेत.

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश

कोल्हापूरच्या गोकूळ दूध संघाच्या कारभारावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. त्यातच दोनच दिवसांपुर्वी गोकूळ दूध संघाच्या मुख्य कार्यालयात निनावी पत्र आलं आणि त्यात गोकूळच्या पशुसंवर्धन विभागाच्या औषध खरेदीत घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आलाय.त्यावरून काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोकुळ दूध संघातील दुधाची चोरी, वाहतुकीचे अंतर वाढवून केलेल्या 35 लाख रुपयांचा घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. त्यातच घोटाळा उघडकीस आल्यानंतरही घोटाळेबाजांवर एफआयआर केली जात नाही. तोच धागा पकडून शौमिका महाडिकांनी गोकूळच्या कारभारावर टीका करत या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केलीय..निनावी पत्र हा खोडसाळपणा असल्याचा दावा गोकूळ दूध संघाचे कार्यकारी संचालकांनी म्हटलंय.

कोल्हापूर जिल्ह्यावर राजकीय वर्चस्वाचा मार्ग गोकूळ दूध संघातून जातो, असं कोल्हापूरमध्ये समीकरण आहे. मात्र निनावी पत्राने गोकूळचं राजकारण ढवळून निघालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालकीच्या असलेल्या गोकूळ दूध संघातील घोटाळ्यांच्या आरोपांची चौकशी करून दूध का दूध आणि पानी का पानी करण्याची आवश्यकता आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply