Maratha Andolan: 'आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या', गिरीश महाजनांची आंदोलकांना विनंती

Girish Mahajan On Maratha Reservation Protest:जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अद्यापही सुरु आहे. त्यांनी मराठा आरक्षण मेलात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे.

यातच आज मंत्री गिरीश महाजन आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. महाजन यांनी त्यांना तुमची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या असं म्हटलं आहे.

Talathi Exam 2023 : तलाठी परीक्षा नियोजित वेळतच होणार; उमेदवारांनी वेळेपूर्वी हजर राहावं, आयोजन संस्थेचा मेल

काय म्हणाले गिरीश महाजन?

गिरीश महाजन म्हणाले की, ज्या पद्धतीने लाठी हल्ला झाला तो व्हायला नको होता. गुन्हे मागे घेण्या बाबद विषय होता. त्याबाबद ही निर्णय लवकरच होईल. 

ते म्हणाले, ''तीन महिने झाले अधिकाऱ्याच्या बदल्यात झाल्या. त्यामुळे समितीचे काम संत गतीने सुरु झालं. अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि माहिती अधिकारी जसा आणला ते ही लगेचं झाले नाही, त्या प्रक्रियेला ही वेळ गेला. अत्ता तीन महिन्यात सरकार आलं. त्या अगोदर सरकार वेगळं होत. आमचं सरकार असताना आम्ही निर्णय घेतले. आम्ही उच्च न्यायालयापर्यंत गेलो. मात्र मागच्या सरकारने काहीच केले नाही.'' 

दरम्यान, मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधा संदर्भात राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या महत्वाची बैठक होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply