Girish Mahajan : गिरीश महाजन म्हणतात, पंधरा दिवसांत मोठा राजकीय भूकंप; राऊत म्हणाले, जपान...

Girish Mahajan : येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. महाजनांच्या दाव्याला ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मिश्कीलपणे उत्तर दिलंय.

काय म्हणाले गिरीश महाजन?

निवडणुकीच्या आधी राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे. कुठल्या पक्षात काय होईल, ते कळेलच. पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये हा राजकीय भूकंप होईल. भाजपमध्ये येण्यासाठी अनेक पक्षातले अनेक नेते इच्छूक आहेत.

Kolhapur News : पावनगडावरील अनधिकृत मदरसे प्रशासनाने हटवले; गुप्तता पाळत रात्रीतून कारवाई

''भूकंप व्हायला हा महराष्ट्र आहे, जपान नाही!''

भूकंप व्हायला हा महाराष्ट्र आहे, जपान नाही. जेव्हा २०२४ मध्ये खऱ्या अर्थाने भूकंप येईल, तेव्हा हे सगळे वाहून जातील. ईडीच्या भीतीने पक्ष फोडणं याला भूकंप म्हणत नाहीत. विरोधकांवर धाडी घालणं, त्यांना तुरुंगात पाठवणं याला भूकंप म्हणत नाहीत तर डरपोकपणा म्हणतात.

दरम्यान, २०१९मध्ये ज्या पद्धतीने भाजपकडे मेगाभरती झाली होती. तशीच भरती आता २०२४च्या निवडणुकीपूर्वी होईल, असं सांगितलं जातंय. यासंदर्भात भाजपचे नेते वारंवार बोलत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये फूट पडणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply