Ghatkopar Hoarding Case : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून ४ जणांचा मृत्यू, ६९ जणांना केलं रेस्क्यू; कंपनीवर गुन्हा, उच्चस्तरीय चौकशी होणार

Ghatkopar Hoarding Case : घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू तर ६९ जण जखमी झाले आहे. ४७ जणांना रेस्क्यू करण्यात आले. जखमींवर राजावाडी रुग्णालयात  उपचार सुरू आहेत. अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या कंपनीविरोधात मुंबई महानगर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. पालिकेने होर्डिंग लावणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावर सध्या मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी फोनवर चर्चा करून होर्डिंग दुर्घटनेची माहीती घेतली.

घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत पोलिस ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक होर्डिंग कोसळले. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग अनधिकृत होते. या अनधिकृत होर्डिंगप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Mumbai News : मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!

मुंबई महानगर पालिकेकडून फक्त ४० फूटांचे होर्डिंग लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. तरी देखील हे १२० फूटांचे होर्डिंग लावलेच कसे, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. होर्डिंग लावणाऱ्याला यापूर्वीच पालिकेने नोटीस पाठवली होती. घटनास्थळावर बचवकार्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. आतापर्यंत ४७ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत सांगितले की, 'घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ४७ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी उपचार करण्यात येत असून त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.'

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply