Ghati Hospital News : छत्रपती संभाजीनगरमध्येही नांदेड'ची पुनरावृत्ती, घाटी रुग्णालयात एकाच दिवशी १० रुग्ण दगावले

Ghati Hospital News : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ रुग्ण दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. अपुरा औषध पुरवठा आणि वेळेत उपचार न मिळाल्याने या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. एकीकडे नांदेडच्या या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असतानाच छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही १० रुग्ण दगावल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात एका दिवसात २ बालकांसह १० रुग्ण दगावल्याचे समोर आले आहे.

Pune News : पुणे, खडकी कँटोन्मेंटमध्ये जागेच्या भाड्यापेक्षा मुद्रांक शुल्क जास्त

राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्णांचा मृत्यू होत असल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. याबाबत रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण उशिरा येतात, त्यामुळेच मृत्यू होत असल्याचे स्पष्टिकरण हॉस्पिटल प्रशासनाने दिले आहे.

घाटी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावरुन ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे. मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री काय करतात? असा सवाल ही चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे.

प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया..

दरम्यान, नांदेडमधील धक्कादायक प्रकरणावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र प्रशासनाने या 24 अमूल्य मानवी जीवांची हत्या केली आहे,, असा घणाघात आंबेडकरांनी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply