Ganpat Gaikwad Firing Case : गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रणजीत यादवला अटक; मुलगा अद्याप फरार

Ganpat Gaikwad Driver Arrested : भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. गणपत गायकवाड प्रकरणातील आरोपी रणजीत यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. रणजीत यादव गणपत गायकवाड यांचा वाहन चालक आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर तो फरार होता. पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतलं आहे.

सदर प्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड देखील फरार आहे. पोलीस आमदारांच्या मुलाचाही शोध घेत आहेत. गणपत गायकवाड यांचा चालक रणजीत यादवला उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. उल्हासनगर न्यायालयाने त्याला 14 तारखेपर्यंत दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावलीये.

Pune Crime : पुणे हादरलं! बुधवारपेठेत भररस्त्यात तरुणाची गळा चिरुन हत्या; पोलीस तपासात धक्कादायक कारण आलं समोर...

गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात जेवण सोडलं

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते कळवा पोलीस ठाण्यात अटकेत आहेत. अशात गेल्या ३ दिवसांपासून ते जेवत नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

घडलेल्या प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांनी अन्न त्याग केला आहे. त्यामुळे तज्ज्ञांकडून त्यांचे समुपदेशन होण्याची शक्यता वर्तवली जातेय. गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली होती. आता वाहन चालकाला अटक केल्याने ही संख्या ७ वर पोहचली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply