Ganpat Gaikwad : गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात जेवण सोडलं; गेल्या २ दिवसांपासून अन्न त्याग

Ganpat Gaikwad : उल्हासनगर पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते कळवा पोलीस ठाण्यात अटकेत आहेत. अशात गेल्या २ दिवसांपासून ते जेवत नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

गेल्या दोन दिवसंपासून आमदार यांनी जेवण केलेलं नाही. त्यामुळे तज्ज्ञांकडून त्यांचे समुपदेशन होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड आणि नागेश बढेकर अद्याप फरार आहेत.

पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू असून लवकरच पोलीस त्यांना ताब्यात घेतील अशी शक्यात आहे. या प्रकरणात तपासासाठी ठाणे जिल्ह्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहा टीम कार्यरत आहेत.

आमदार गणपत गायकवाड गोळीबारप्रकरणी पोलीसही अडचणीत

शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळाबारप्रकरणी आता हिललाइन पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे.

  • पोलीस ठाण्याच्या आवारातील राजकीय परिस्थिती हाताळण्यात हिललाइन पोलीस कुठे कमी पडले?

  • दोन्ही गटांचे समर्थक इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात कसे आले?

  • अधिकाऱ्यांना राजकीय परिस्थितीचा अंदाज का घेता आला नाही?

  • महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड हे दोघेही एकाच दालनात असताना तेथे पोलीस अधिकारी का नव्हते?

  • पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीचे फुटेज इतक्या तातडीने माध्यमांमध्ये प्रसारित कसे झाले?

गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारावर विरोधकांनी असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात उपस्थित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply