Ganpat Gaikwad : गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदे पिता-पुत्रांवर केले गंभीर आरोप

Ganpat Gaikwad :मुंबईच्या उल्हासनगर परिसरात शुक्रवारी (२ फेब्रुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली. कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे हिललाईन पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडला. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. 

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या गोळीबारानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले.

Ulhasnagar Firing News : भाजपा आमदाराची दादागिरी, शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर पोलीस ठाण्यातच गोळीबार

"माझ्या मुलाच्या अंगावर महेश गायकवाड धावून आले. पोलीस स्टेशनबाहेरही त्यांनी शेकडो मुलं जमा केली होती. हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही. म्हणूनच मी गोळीबार केला", असं आमदार गायकवाड यांनी सांगितलं.

"जर माझ्या नजरेसमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील, तर माझा जगून तरी काय फायदा? त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला. मी केलेल्या गुन्ह्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही", असंही आमदार गणपत गायकवाड यांनी माध्यमांसमोर सांगितलं.

मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप

आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे पिता-पुत्रांवर देखील गंभीर आरोप केले. कल्याण पूर्वेत शिंदे बापलेक माझ्यावर अन्याय करत राहिले. माझे करोडो रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यांनी ते परत केले नाहीत. दुसरीकडे मी केलेल्या कामांचं क्रेडिट खासदार श्रीकांत शिंदे घेत होते. मला राजकीयदृष्ट्या संपविण्याचा डाव शिंदेंनी आखला होता, असं गायकवाड म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply