Gangapur Crime Case : मुलाचा मृतदेह शासनाने पोहोचवावा; अंत्ययात्रा न काढता अंत्यसंस्कार करा; खंडपीठाचा आदेश

Gangapur Crime Case : गंगापुरात ८ महिन्यांपूर्वी हत्या झालेल्या मुलाचा मृतदेह उकरून शासनाने स्वखर्चाने त्याच्या आईच्या घरी पोहोचवावे. अंत्ययात्रा न काढता प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलाय. गंगापूर येथील झंपराबाई श्रीमंत भोसले यांनी त्यांचा ३५ वर्षांचा मुलगा रवी हरवल्याची तक्रार मे २०२४ मध्ये गंगापूर पोलिस ठाण्यात दिली होती.

गंगापुरात एक भंयकर हत्येची घटना घडली होती. मे २०२४मध्ये रवी भोसले या व्यक्तीची निर्घृण हत्या करून ६ सहा तुकडे करण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे पुरले होते. पुरलेला मृतदेहाचे तुकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी रवीच्या आईची यातायात सुरू होती. पोलीस पुरलेल्या मृतदेहाचे तुकडे देत नसल्यामुळे आईनं थेट न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलासादायक निर्णय दिला.

नेवासा तालुक्यातील मुळा धरणात रवीच्या मृतदेहाचे सहा तुकडे सापडले होते. गंगापूर पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी झंपराबाईंचे रक्ताचे नमुने घेतले होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये डीएनए अहवाल आला. त्यात दोन्ही डीएनए जुळले. पोलिसांनी मे २०२४मध्ये नमुने घेतल्यानंतर मृतदेह पुरून टाकला होता. मयत मुलाचा मृतदेहाचे अवशेष मिळावेत, यासाठी मयताच्या आईनं नेवासाच्या तहसीलदारांकडे अर्ज केला.

Beed News : बीडच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा, आवरगावच्या सरपंचाला मिळाले प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण

नेवासा तालुक्यातील मुळा धरणात रवीच्या मृतदेहाचे सहा तुकडे सापडले होते. गंगापूर पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी झंपराबाईंचे रक्ताचे नमुने घेतले होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये डीएनए अहवाल आला. त्यात दोन्ही डीएनए जुळले. पोलिसांनी मे २०२४मध्ये नमुने घेतल्यानंतर मृतदेह पुरून टाकला होता. मयत मुलाचा मृतदेहाचे अवशेष मिळावेत, यासाठी मयताच्या आईनं नेवासाच्या तहसीलदारांकडे अर्ज केला.

आदेश देणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर झंपराबाई यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर रवीच्या आईनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठाने मृतदेह शासनाने पोहोचवावा, अंत्ययात्रा न काढता अंत्यसंस्कार करावे असा आदेश दिला.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply