Gadchiroli News : वैनगंगा नदीत नाव उलटली; ६ महिला बुडाल्या, एका महिलेला वाचविण्यात यश

Gadchiroli News : गडचिरोली मधील वैनगंगा नदीच्या गणपूर (रै.) घाटावरून निघालेली नाव पाण्यात बुडाल्याची घटना  घडली. यात नावमधील ६ महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेचा मृतदेह मिळाला असून अद्याप ५ महिला बेपत्ता आहेत.

वैनगंगा नदीच्या गणपूर घाटावरून सदर महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात नावेच्या सहाय्याने जात होत्या. या दरम्यान अचानक पाण्यात नाव वाहून गेल्यामुळे यात बसलेल्या सात महिला आणि नावाडी बुडाले. नावाडी पोहून बाहेर निघून गेले व एका महिलेला वाचविण्यात आले. परंतु अन्य सहाही महिलांना पोहून बाहेर निघता न आल्याने पाण्यात बुडाल्या आहेत. या घटनेत गणपूर (रै.) येथील पोलीस पाटलाची पत्नीसुध्दा वाहून गेल्याची माहिती प्राप्त होत आहे. 

Mumbai High Court : उस्मानाबाद-धाराशिव नामांतर विरोधात याचिका, गुरुवारी सुनावणी

घटनेची माहिती मिळताच बचाव पथक व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पाण्यात बुडालेल्या महिलांपैकी एका महिलेचा मृतदेह सापडला असून अन्य पाच महिलांचा शोध घेतला जात आहे. चामोर्शी पोलीस  घटनास्थळी पोहचले आहेत. शोधमोहीम वेगात सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply