Gadchiroli Flood : गडचिरोलीला पावसाने झोडपले, ५ व्या दिवशी पूरस्थिती कायम; राष्ट्रीय महामार्गासह १२ प्रमुख रस्ते बंद

 

Gadchiroli : गडचिरोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या ५ दिवसांपासून गडचिरोलीमध्ये पूरस्थितीआहे. सतत पडणारा पाऊस आणि पूर यामुळे गडचिरोलीमधील जनजीवन विस्कळीत झाले आहेत. या पावसामुळे गडचिरोलीतील नद्या, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. या पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर या पुरामुळे ४ राष्ट्रीय महामार्गासह  १२ प्रमुख मार्ग बंद झाले आहेत.

गेल्या पाच दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाचव्या दिवशीही गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे. पूराचे पाणी महामार्गावर आल्यामुळे गडचिरोली-चामोर्शी, गडचिरोली-नागपूर, आष्टी-आल्लापल्ली, आलापल्ली-भामरागड हे ४ प्रमुख राष्ट्रीय महामार्ग बंद झाले आहेत. या ४ महामार्गासह जिल्ह्यातील १२ मार्ग देखील बंद झाले आहेत.

Wainganga River Flood : वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; कारधा छोट्या पुलावर पाणी आल्याने पुल केला बंद

पूरस्थितीमुळे जिल्ह्यात तीन दिवसांपासून भाजीपाला, दूध, ब्रेड अशा आवश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. मात्र मध्यरात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. त्यातच गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्यामुळे वैनगंगा नदीने पात्र सोडले आहे. परिणामी अनेक मार्ग बंद असून शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply