G20 Summit Pune : परदेशी पाहुण्यांना ढोल-ताशाची भुरळ

पुणे : जी 20 परिषदेला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले . आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप (IWG) ची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करतील.G20 परिषदेच्या निमित्ताने 35 देशातील राजदूत हे सध्या पुण्यात आहेत. आज आणि उद्या पुण्यात दोन दिवस ही G20 परिषद आहे.

याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज पुणे विद्यापीठात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पुणे विद्यापीठातील याच कार्यक्रमात पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी ढोल ताशा आणि लेझीम पथक लावण्यात आलं होतं.या कार्यक्रमात परदेशी पाहुण्यांना देखील आपल्या भारतीय ढोल ताशाची आणि लेझीमची भुरळ पडलेली पाहायला मिळाली..हे पाहुणे ढोल पथकासोबत ढोल ताशा वाजवताना आणि लेझीम खेळताना पहायला मिळाले.यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला.ढोल, लेझीम, टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली.शिव वंदना, शिवराज्याभिषेक गीत देखील यावेळी सादर करण्यात आले.यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, पुणे महानरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply