Ajit Pawar : अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, अर्थमंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीवर्षाव, किती निधी केला मंजूर?

Mumbai News: राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याचा कार्यभार देण्यात आला होता. खाते वाटपानंतर अजित पवार यांनी तात्काळ सूत्रे हाती घेतली होती. आता अर्थखात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार यांनी आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,अजित पवार यांनी अर्थखात्याची सुत्रे हाती घेताच आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधी वाटप केला आहे. या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी प्रत्येकी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे.

विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अजितदादांना साथ देण्याच्या निर्णयामुळे आपल्या मतदारसंघातील रखडलेल्या विकास कामांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे आमदार सरोज अहिरे यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे.

Amit Thackeray : अमित ठाकरेंचा ताफा समृद्धी महामार्गावर रोखला? भडकलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला

तर, नाराजी टाळण्यासाठी १५०० कोटींच्या तरतुदीतून राष्ट्रवादीबरोबरच शिंदे गटाच्या काही आमदारांच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यातूनच राष्ट्रवादीबरोबरच शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. अजित पवारांनी शिंदे गटाच्या काही आमदारांनाही निधी मंजूर करीत त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढण्यामागे निधीवाटप हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply