महावितरणमध्ये कामाला असल्याच्या बतावणीने २५ हजारांची फसवणूक

महावितरणचे कर्मचारी असल्याची बतावणी करून दोघांनी एका ग्राहकाकडून २५ हजार रुपये उकळल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी भगवान प्रभाकर गायकवाड (वय ३३) आणि संजय ज्ञानदेव शिरगीरे (वय ३९, दोघे रा. माळवाडी, हडपसर) यांच्या विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महावितरणचे अभियंता रविंद्र दत्ता मोसलगी (वय ३५, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गायकवाड आणि शिरगिरे हे नितीन हंबीर, अमित आवारे यांच्याकडे गेले होते.

महावितरणधील कर्मचारी असल्याची बतावणी दोघांनी त्यांच्याकडे केली. वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरीचा आरोप केला. त्यानंतर कारवाईची धमकी देऊन त्यांच्याकडून २५ हजार रुपये घेतले. दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे हंबीर आणि आवारे यांनी चौकशी केली. तेव्हा गायकवाड, शिरगिरे महावितरणचे कर्मचारी नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महावितरणकडून दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply