Fraud Marriage: पैशांचा लोभ.. भाऊ-बहिणीलाच घ्यायला लावले 'सात फेरे'; प्रकरण नेमकं काय?

लखनऊ- यूपीच्या मगराजगंज जिल्ह्यातील लक्ष्मीपूर भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत अनुदान आणि काही वस्तू दिल्या जातात. याच्याच लोभापाई भाऊ-बहिणीचे नातेवाईक आणि दलालांनी लग्न लावून दिले आहे. जेव्हा घटना समोर आली तेव्हा एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत पाच मार्च रोजी लक्ष्मीपूर ब्लॉकमध्ये ३८ जोडप्यांचे लग्न झाले होते. लक्ष्मीपूर भागातील एका महिलेने देखील लग्नासाठी नोंदणी केली होती. दाव्यानुसार, महिलेचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. तिचा पती कामानिमित्त बाहेर गावी राहतो. दलालांनी महिलेला लग्नासाठी तयार केलं. लग्नासाठी एक मुलगा देखील उभा करण्यात आला.

सरकारी अधिकाऱ्यांची धावपळ

मुलगा फेरे घ्यायला आला नाही, त्यामुळे दलालांची पचाईत झाली. अशावेळी नातेवाईकानी आणि दलालांनी काही पैसे मिळवण्यासाठी थेट भावालाच लग्नासाठी गळ घातली. भाऊ आणि बहिणीने सात फेरे घेतले, त्यांची पती-पत्नी म्हणून सरकार दरबारी नोंद करण्यात आली. सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली. अधिकाऱ्यांनी लग्नात देण्यात आलेल्या सर्व वस्तू परत घेतल्या आहेत. तसेत अनुदान म्हणून मिळणाऱ्या ३५ हजार रुपयांच्या रक्कमेवर स्थगिती आणली आहे.

Pune News : पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन टप्प्यांत मतदान; दुबार, बोगस मतदार डोकेदुखी

लक्ष्मीपूरचे बीडीओ अमित मिश्रा यांनी सांगितलं की, ५ मार्च रोजी झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. यात भाऊ आणि बहिणीने सात फेरे घेतले आहेत. सुरुवातीच्या तपासानंतर त्यांना देण्यात आलेल्या वस्तू परत मागण्यात आल्या आहेत. अनुदान रोखण्यात आलं आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. याप्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

याआधीही अनेकदा झालीये फसवणूक

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. बलियामध्ये असाच एक प्रकार समोर आला होता. २५ जानेवारीला ५३७ जोडप्यांचे सामूहिक विवाह झाले होते. यात अनेक जोडपे खोटे निघाले होते. अनेकांने आधीच लग्न झाले होते. काहींना पैसे देऊन आणण्यात आलं होतं. यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात काही महिला स्वत:च हार घालताना दिसत आहेत. काही महिला स्वत:च कुंकू लावून घेत आहेत. याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली होती. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply