Forest Department Action : ९० हजारांचे लाकूड जप्त; वन विभागाची कारवाई, चालक पसार

Forest Department Action : नायगाव - किनगाव रस्त्यावर पश्चिम वन विभागाच्या गस्ती पथकाने पीकअप व्हॅन वाहनासह पाच लाख रुपये किमतीचे खेर जातीचे मौल्यवान लाकूड जप्त केले. अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावर  वाहन सोडून चालक पसार झाला आहे. 

वन विभागाला  मिळालेल्या गुप्त माहितीवरून २ जानेवारीला यावलच्या वनपाल गस्ती पथक व रेंज स्टाफ यावल पश्चिमसह शासकीय वाहनाने नायगाव- किनगाव मार्गावरील रस्त्यावर गस्त होते. या वेळी किनगावकडे जात असताना एक संशयित वाहन भरधाव वेगाने जात असता त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक वाहन सोडून अंधारात पसार झाला. या वाहनाची तपासणी केली असता त्यात खैर प्रजातीचे लाकूड मिळून आले. 

Jalgaon Accident News : भरधाव कारने शाळकरी मुलांना चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू, २ जखमी

वाहन जप्त करून शासकीय विक्री आगार यावल येथे आणून पावतीने जमा करण्यात आले असून, जप्त माल वाहनासह त्यात असलेले खैर जातीचे अंदाजे ५ हजार घन मीटर लाकूड व वाहन तसेच मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत ५ लाख रुपये एवढी आहे.
या कार्यवाहीत गस्ती पथकात वनपाल आर. बी. थोरात, वनपाल (वाघझिरा) विपुल पाटील, वनरक्षक (निंबादेवी) अक्षय रोकडे, वनरक्षक (मनुदेवी) चेतन शेलार, वाहनचालक योगिराज तेली तसेच पोलिस कर्मचारी सचिन तडवी यांनी सहभाग घेतला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply