Footbridge Collapsed in jammu and kashmir: जम्मू-काश्मीरात बैसाखी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना, पूल कोसळून ८० हून अधिक जण जखमी

Jammu and kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात शुक्रवारी पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ८० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बैसाखी उत्सवादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. 

जम्मू-काश्मीरात बैसाखी उत्सवादरम्यान उधमपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत ८० हून अधिक जण जखमी झाले आहेत. उधमपूरच्या एका गावात बैसाखी उत्सव साजरा करण्यात येत होता. उत्सव साजरा करण्यासाठी अनेक भाविक या कार्यक्रमाला हजर झाले होते. याचवेळी ही मोठी दुर्घटना घडली आहे.

चेनानी महानगरपालिकेचे अध्यक्ष मानिक गुप्ता यांनी या घटनेबद्दल माहिती दिली आहे. मानिक गुप्ता म्हणाले, उधमपूर जिल्ह्यात झालेल्या या घटनेत ८० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर २० ते २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर यापैकी सहा ते सात जणांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रुग्णालयातील कर्मचारी जखमींवर लक्ष ठेवून आहे'.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि इतर दलाने बचाव कार्य सुरू केले आहे. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये महिला आणि लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ भाविकांचा धावपळ दिसून येत आहे. या घटनास्थळी एक रुग्णवाहिका दिसून येत आहे. या घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply