Fire Accident : हांडेवाडी रस्त्यावरील भाजीमंडईला आग लागून विक्रेत्यांच्या मालाचे नुकसान

हडपसर : हांडेवाडी रस्त्यावरील वाघजाई मंदिराजवळील भाजीमंडईला आग लागून सुमारे सव्वाशे स्टॉलधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. मध्यरात्री (ता. २१) सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही.

या आगीमध्ये व्यापाऱ्यांचा भाजीपाला, फळे, इतर साहित्य, हातगाड्या व दोन तीनचाकी वाहने जळून खाक झाली आहेत. मंडई बंद झाल्यानंतर येथे कोणीही राहत नसल्याने जीवितहानी झाली नाही.

याठिकाणी पत्राशेडखाली पालिकेची भाजीमंडई आहे. त्यामध्ये सुमारे सव्वाशे उघडे स्टॉल आहेत. भाजीपाला विक्री बंद झाल्यानंतर हा मंडई परिसर निर्मनुष्य होत असतो. तेथे वॉचमन अथवा सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. पालिकेने तातडीने या सुविधा देणे आवश्यक आहे.

- विजया वाडकर, माजी नगरसेविका

"ही मंडई सुनियोजित नाही. याठिकाणी स्वतंत्र पाणी, स्वच्छतागृहे नाहीत. अनेक विक्रेते रस्त्यावर बसलेले असतात. नियंत्रण नसल्याने व्यापारी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने सर्व सुविधा देणे गरजेचे आहे,' अशी मागणी पथारी व्यावसायिक पंचायतचे जिल्हाध्यक्ष मोहन चिंचकर, हडपसर विभाध्यक्ष बलभिम यवते, कार्यअध्यक्ष सुलतान बागवान, पुणे महानगरपालिका पथ विक्रेता समीती सदस्य शेहनाज बागवान यांनी केली आहे.

"रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हांडेवाडी रस्त्यावरील भाजीमंडईला आग लागल्याचे समजले. तातडीने तीन अग्निशामक वाहने व कर्मचारी पाठवून आग विझवली आहे. ही आग कशामुळे लागली, याबाबत अद्याप समजलेले नाही.'

- प्रमोद सोनवणे फायर स्टेशन अधिकारी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply