Fifa World Cup : मोरोक्कोला धूळ चारत क्रोएशिया पोहोचली तिसऱ्या स्थानावर; संघ ठरणार 225 कोटी रुपयांचा मानकरी

Fifa World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये क्रोएशियाने जबरदस्त खेळ दाखवला. तिसऱ्या स्थानासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात क्रोएशियाने मोरोक्कोला २-१ ने धूळ चारली. क्रोएशिया संघ गेल्या वर्षी फिफा वर्ल्ड कपमध्ये उपविजेता संघ ठरला होता.

दुसरीकडे मोरोक्को टीम सेमीफायनल मध्ये पोहोचणारी आफ्रिकेची पहिली टीम आहे. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत क्रोएशियाने मोरोक्कोचा मोठा पराभव केला. त्यामुळे मोरोक्काला चौथ्या स्थानावर राहत समाधान व्यक्त करावं लागणार आहे. या पराभवामुळे मोरोक्काचं फिफा वर्ल्ड कपमधील आव्हान देखील संपुष्टात आलं आहे.

क्रोएशिया आणि मोरोक्को संघ भलेही फायनलमध्ये पोहोचले नसतील. तरीही या दोन्ही संघ कोटी रुपयांचे मानकरी ठरणार आहे. तिसऱ्या स्थानासाठी क्रोएशियाला २२५ कोटी रुपये मिळणार आहे. तर मोरोक्कोला चौथ्या स्थानासाठी २०६ कोटीपर्यंत रुपये मिळणार आहे.

दरम्यान, फिफा वर्ल्ड कपमध्ये फायनल जिंकणाऱ्या संघाला ३४७ कोटी रुपये मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला २४८ कोटी रुपये मिळणार आहे. फिफा वर्ल्ड कपचा अंतिम सामना हा फ्रान्स आणि अर्जेंटीनामध्ये होणार आहे. हा सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे.

विजेत्या संघाला किती कोटी मिळणार?

विजेता - ३४७ कोटी रुपये

उप-विजेता - २४८ कोटी रुपये

तिसऱ्या स्थानासाठी - २२५ कोटी रुपये

चौथ्या स्थानासाठी - २०६ कोटी रुपये



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply