FIFA U-17 Women's World Cup 2022 : फिफा महिला विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; नवी मुंबईत रंगणार अंतिम सामना

नवी दिल्ली : युवा फुटबाॅलप्रेमींना वेध लागलेल्या सतरा वर्षाखालील फिफा महिला विश्वकरंडक स्पर्धेचे (FIFA U-17 womens world cup) वेळापत्रक आज (बुधवारी) फिफा (FIFA) आणि स्थानिक आयोजन समितीने (LOC) जाहीर केले आहे. भुवनेश्वर (Bhubaneswar) येथे 11 ऑक्टोबरपासून भारताच्या गटातील सामन्यांना  प्रारंभ हाेणार. तसेच गोव्यात  दोन्ही उपांत्य फेरीचे सामने हाेणार आहेत. दरम्यान नवी मुंबईत 30 ऑक्टोबर रोजी अंतिम सामना हाेईल असे सांगण्यात आले आहे. (fifa u-17 womens world cup marathi news)

या स्पर्धेतील गटातील सामने हे 18 ऑक्टोबर रोजी संपतील. हे सामने ओरिसा (odisha), गोवा आणि महाराष्ट्र (maharashtra) या यजमान राज्यांत हाेतील. स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे (quarter final) सामने 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी होतील. त्यानंतर 26 ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे (semi final) सामने होतील.

भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये (Kalinga Stadium) 11, 14 आणि 17 ऑक्टोबरला यजमान भारताच्या गटतील सामने हाेतील. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम (DY Patil Stadium) आणि फातोर्डा (गोवा) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम (Pandit Jawaharlal Nehru Stadium Fatorda, Goa) येथे उपांत्यपूर्व फेरीच्या लढती घेतल्या जाणार आहेत.

स्थानिक आयाेजन समितीचे अंकुश अरोरा आणि नंदिनी अरोरा यांनी एका संयुक्त निवेदनात महिलांच्या उन्नतीसाठी आणि फुटबॉलचा प्रचार व प्रसार वाढवा यासाठी फिफाने दिलेल्या प्राेत्साहनाबद्दल फिफाचे आभार मानले आहेत. वेळापत्रक जाहीर झाल्याने हा ऐतिहासिक स्पर्धेचा एक महत्त्वाचा क्षण असून भारताच्या दुसऱ्या फिफा स्पर्धेच्या यजमानपदाची तयारी प्रगतीपथावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply