Farmers Long March Suspended: अनेक मागण्या मान्य, लाँग मार्च स्थगित; अशोक ढवळे यांची घोषणा

Farmers Long March Suspended: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून सुरू झालेला लाँग मार्च स्थगित करण्यात आला आहे. या मार्चमध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. मात्र, 'सरकारशी चर्चा चांगली झाली. अनेक मागण्या केल्या. त्याची अंमलबजावणी होईल, याकडे आम्ही लक्ष देवू. लाँग मार्च स्थगित करतोय, अशी घोषणा शेतकरी नेते, कॉ. अशोक ढवळे यांनी केली.

अखिल भारतीय किसान सभा या लाँग मार्चचे नेतृत्व केले. या लाँग मार्चबाबत किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले म्हणाले किसान सभेच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी मुंबईपर्यंत लाँग मार्च काढला होता.

त्यानंतर आता २६ एप्रिलपासून (ता. 28 पर्यंत) अकोले ते लोणी (ता. राहाता) येथे शेतकरीपायी लाँग मार्च काढला. शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांसाठी लाँग मार्च काढण्यात आला. त्यातील अनेक मागण्या मान्य पूर्ण झाल्याचे सांगत लाँग मार्च स्थगित करण्यात आला आहे.

लाँग मार्चमधील शेतकऱ्यांना संबोधित करताना मान्य झालेल्या मागण्या शेतकरी नेते अजित नवले सांगताना म्हणाले, 'वन जमिनीचे सगळे दावे जमिनी द्यायच्या आहेत, या विचाराने पुनर्विचारात घेतले जातील.

जोपर्यंत वन दावे निकाल आणि प्रक्रिया सुरू आहे, तोपर्यंत जमिनीवरून कुणालाही विस्थापित केलं जाणार नाही, कुणालाही हाकलून लावलं जाणार नाही. हिरड्या उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. तातडीनं शेतकऱ्यांना १५ कोटी नुकसान भरपाई दिली जाईल. हिरड्याची खरेदी करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय, ९ मे ला बैठक होणार, असेही त्यांनी सांगितले .

नवले पुढे म्हणाले, 'वन्य प्राण्यांमुळे शेतीच होणार नुकसान टाळण्यासाठी सरकार लवकरच उपाययोजना करणार आहे. वरकस जमिनी जे शेतकरी कसतात त्यांचाच यावर हक्क असेल, याचा निर्णय झाला आहे. तत्काळ याबाबत कार्यवाही होणार आहे. वरकस जमिनीबाबत पीक पेरा नोंद होण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. देवस्थान जमिनीबाबत कायदा करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
दुधाला एफआरपीचं संरक्षण देण्यासाठी नवी समिती आखण्यात येईल.दूध उत्पादकांसाठी लवकरच चांगलं धोरण आखणार आहे. किसान सभेच्या प्रतिनिधींचं देखील म्हणणं यात ऐकून घेतलं जाणार, असे नवले यांनी सांगितले. दरम्यान, शेतकरी लाँग मार्च करण्याची घोषणा शेतकरी नेते, कॉ. अशोक ढवळे यांनी केली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply