Farmers Andolan : तळपत्या उन्हात कांदा उत्पादक शेतक-यांनी पुणे नाशिक महामार्ग राेखला; पाेलिस, प्रशासन हतबल

Farmers Rasta Roko Andolan : कांद्याला याेग्य दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतक-यांनी तळपत्या उन्हात पुणे नाशिक महामार्ग राेखून धरला आहे. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासन, पाेलिस शेतक-यांना आंदाेलन मागे घेण्याचे आवाहन करीत आहेत परंतु मागणी मान्य झाल्यानंतरच रास्ता राेकाे आंदाेलन मागे घेतले जाईल अशी भुमिका शेतक-यांनी घेतली आहे. 

यावेळी आंदाेलनापुर्वी सकाळी लिलाव झालेल्या कांद्याला १५ रुपये प्रतिकिलो बाजारभाव करुन द्या तरच रास्ता रोको आंदोलन थांबवु अन्यथा रास्ता रोको आक्रमक करण्याचा शेतक-यांनी निर्धार केला. चाकण पोलिसांनी शेतक-यांना आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. मात्र शेतक-यांनी नकार देत आंदाेलन सुरुच ठेवले.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील बाजार समितीत अचानक बाजारभाव पडल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. ५ ते ८ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये संताप पसरला आहे. यावेळी आंदाेलकांनी खेड तहसिलदारांनी आंदोलकांना शब्द देण्यासाठी यावे अशी मागणी करण्यात आली.

गेले तासभर पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको सुरु असल्याने या महामार्गावर वाहनांच्या माेठ्या रांगा लागल्या आहेत. जाेपर्यंत १५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे कांद्याचा पुन्हा लिलाव हाेत नाही ताेपर्यंत हटणार नाही असेही शेतक-यांनी नमूद केले. खेड प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण हे आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत. त्यांची आंदाेलक शेतक-यांशी चर्चा सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply