
Kolhapur : बनावट नोटा चलनात आणण्यासाठी त्या एटीएम सेंटरच्या डिपॉझिट मशीनमध्ये भरण्याचा प्रयत्न कोल्हापूरात उघडकीस आला आहे. नोटा भरणाऱ्या सराफासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या ८६ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. मात्र नोटा कुठून आल्या या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
निखिल सरगर, अमोल पोतदार आणि शिवप्रसाद कदम या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील संशयित अमोल पोतदार हा सराफ व्यावसायिक आहे. बनावट नोटांचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाल्याचे कोल्हापुरात उघडकीस आलेल्या घटनेवरून सिध्द झाले आहे. कोल्हापुरातील खरी कॉर्नर इथल्या कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेतील एटीएममध्ये २४ सप्टेंबर २०२४ ला ५०० रुपयांच्या ७५ नोटांचा भरणा झाला होता. त्यापैकी ६६ नोटा बनावट असल्याचे बँकेच्या अधिकार्यांच्या लक्षात आले.
|
|
सुरवातीला सराफ सापडला ताब्यात
याबाबत बँकेतील अधिकारी जोतिबा तिरवीर यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाला गुन्ह्याची उकल करण्यास सांगितले. त्यानुसार मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून एटीएम सेंटरमध्ये पैसे भरणार्या तसेच बनावट नोटा देणार्या संशयितांचा शोध सुरू करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी अमोल पोतदार या सराफाला अटक केली.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगार निखिल सरगर याने बनावट नोटा दिल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता अमोल पोतदार याच्याकडं सोन्याची चेन बनवण्यासाठी दिली होती. तो कमी टंचाचं सोनं वापरणार असल्यानं पाचशे रुपयांच्या बनावट नोटा दिल्याचं स्पष्ट केलं.
अधिक चौकशीत निखिल सरगर याला कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर इथं राहणारा शिवप्रसाद कदम याने बनावट नोटा दिल्याचे सांगितले. दरम्यान तपासात अमोल पोतदार याच्याकडून पाचशेच्या आणखी २० नोटा पोलिसांनी जप्त केल्या. तसेच शिवप्रसाद कदमला देखील अटक करण्यात आली. या तिघांना न्यायालयानं २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावलीय.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

