Fact Check : सानिया मिर्झाशी घटस्फोटानंतर शोएब मलिक भंजाळला, आता चौथ्यांदा चढणार बोहोल्यावर ? या सुंदरीशी जोडलं जातंय नाव

शोएब मलिक चौथ्यांदा करणार लग्न ? Image Credit source: social media

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिचा पूर्व पती आणि पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik) खेळापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. सानियाशी घटस्फोट झाल्यानंतर शोएब मलिक याने जानेवारी 2025 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी तिसरं लग्न केलं होतं. मात्र आता तो पुन्ह एकदा प्रकाशझोतात आलाय. आता चौथ्या लग्नासाठी शोएब मलिकचं नाव पुन्हा एकदा चर्चेत असून आणखी एका तरूणीशी त्याचं नाव जोडलं जात आहे. मलिकच्या चौथ्या लग्नाची चर्चा, त्यामागचं सत्य आहे तरी काय, चला जाणून घेऊया..

खरं तर, क्रिकेटर शोएब मलिक आता चौथ्या लग्नाची तयारी करत आहे असा दावा करणाऱ्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. आता शोएबचं नाव हे पाकिस्तानी अभिनेत्री लाइबा खानशी जोडले जात आहे.

चौथ्या लग्नाचं सत्य काय ?

या विविध चर्चा सुरू असल्या तरी शोएबच्या चौथ्या लग्नाची बातमी पूर्णपणे खोटी आहे. मलिकशी जिचं नाव जोडलं जातंय ती अभिनेत्री लाइबा खान आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला तिने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं समोर आलं आहे.

शोएब मलिकची तीन लग्नं

शोएब मलिकच्या तीन लग्नांबद्दल सांगायचं झालं तर, त्याचं पहिलं लग्न 2002 साली आयेशा सिद्दीकी नावाच्या महिलेशी झालं होते. त्यानंतर 2010 मध्ये मलिकने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी लग्न केले. मात्र 14 वर्षांनी त्यांचा संसार मोडला.  नंतर 2024 मध्ये मलिकने अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं. आत्तापर्यंत शोएब मलिकची तीन लग्न झाली आहेत.

शोएब मलिकचं आंतरराष्ट्रीय करिअर

पाकिस्तानचा माजी खेळाडू असलेल्या शोएब मलिकने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 35 कसोटी, 287 एकदिवसीय आणि 124 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले हे लक्षात घेण्यासारखे आहे. मलिकने कसोटीत 1898 धावा केल्या आणि चेंडूने 32 विकेट घेतल्या. याशिवाय, त्याने एकदिवसीय सामन्यात 7534 धावा केल्या आणि 158 विकेट्स घेतल्या. टी-20 मध्ये, मलिकने 2435 धावा केल्या आणि 28 विकेट्स घेतल्या. एवढंच नव्हे तर शोएब मलिक हा आयपीएलमध्ये एकाच हंगामात खेळणाऱ्या काही पाकिस्तानी खेळाडूंपैकी एक आहे. 2007 -08 सालच्या पहिल्या हंगामात मलिक हाँ दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *