‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर

Entertainment  : सध्या छोट्या पडद्यावर टीआरपी हा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सातत्याने वाहिन्यांकडून नवनवीन प्रयोग केले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाहिन्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने या तीन प्रसिद्ध विनोदवीरांचा नवा कार्यक्रम ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ सुरू झाला. अल्पावधीत या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

दर आठवड्याला टीआरपी रिपोर्ट येत असतो. मागील आठवड्याच्या टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. ‘मराठी टीआरपी तडका’ इन्स्टाग्राम पेजवर टीआरपी रिपोर्ट शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमावर डॉ. निलेश साबळेचा नवा कार्यक्रम ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ वरचढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Border 2 Movie Updates : 'बॉर्डर 2' ची रिलीज डेट आली समोर; सनी देओलसोबत दिसणार हा स्टार अभिनेता

मागील आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पेक्षा जास्त टीआरपी ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाला मिळालेला दिसत आहे. गेल्या साडेपाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीआरपीच्या यादीत ३७व्या स्थानावर आहे. ०.६ रेटिंग या कार्यक्रमाला मिळाले आहेत. तर निलेश साबळेचा नवा कार्यक्रम ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ ३२व्या स्थानावर असून १.० रेटिंग मिळालं आहे.

याशिवाय ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाला देखील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ पेक्षा कमी टीआरपी आहे. आदेश बांदेकरांचा ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम ३३व्या स्थानावर असून ०.८ रेटिंग मिळालं आहे.

दरम्यान, ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे सांभाळत आहे. या कार्यक्रमात भाऊ कदम व ओंकार भोजने व्यतिरिक्त अभिनेत्री सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण असे अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत. तसंच या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विनोदाचे बादशहा, अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून दिसत आहेत.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply