Rani Mukerji : राणी मुखर्जीला 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार!

Rani Mukerji bollywood Actress : प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी ही तिच्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ राणीनं तिच्या अभिनयाची वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटविल्याचे दिसून आले आहे. आता तिच्याविषयीची एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

राणीला मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. समीक्षकांची मोठी पसंती राणीच्या नावाला मिळाल्याचे दिसून आले. त्या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक होताना दिसत आहे. त्यामुळेच की काय तिच्या नावाभोवतीचं ग्लॅमर अद्यापही कायम आहे. बॉलिवूडची आयकॉन राणी मुखर्जी हिला नुकत्याच झालेल्या झी सिने अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आणि चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे या चित्रपटामध्ये साकारलेली भूमिका ही तिच्या आजवरच्या इतर काही भूमिकांपैकी एक आहे. असे म्हटले होते. यापूर्वी राणीच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली आहे. ब्लॅक, कभी खुशी कभी गम, मर्दानी, गुलाम सारख्या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष लोकप्रिय झाल्या होत्या. आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी एका आईचा संघर्ष खूप काही सांगून जाणारा आहे. त्यात राणीनं उभी केलेली ती व्यक्तिरेखा जबरदस्त आहे.

Electoral Bond Case : निवडणूक रोखे प्रकरणात सुप्रीम कोर्टाने एसबीआयला झापलं; उद्यापर्यंत माहिती देण्याचे आदेश

राणीचा मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. ओटीटीवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय होता. त्याच्यावर नेटकऱ्यांनी देखील दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट होत्या. आता या चित्रपटासाठी राणीला गौरविण्यात येणं हा तिच्या चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यांनी तिला शुभेच्छा देत तिचे कौतुकही केले आहे.

पुरस्कार मिळाल्यावर राणी म्हणाली, “हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. हे माझे इंडस्ट्रीतील 27 वे वर्ष आहे आणि माझ्या कामाचा गौरव आणि सन्मान होत आहे हे पाहून आनंद वाटतो. मिसेस चॅटर्जी हा चित्रपट खूप खास आहे कारण तो एका आईची आणि तिच्या ताकदीची कथा आहे. कारण ही प्रत्येक भारतीय स्त्रीची, प्रत्येक आईची कथा आहे. मी विशेषतः माझ्या दिग्दर्शिका आशिमा छिब्बरचे आभार मानू इच्छिते ज्यांनी मला या चित्रपटात संधी दिली.

यावेळी मला माझे निर्माते, सहकारी कलाकार यांचे देखील आभार मानायचे आहे. अशा आशयाचे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत नसताना, अशा वेळी माझ्या पाठीशी उभे राहून या चित्रपटाला पाठिंबा दिल्याबद्दल मी निर्माते झी स्टुडिओ - शारिक, भूमिका आणि एम्मा एंटरटेनमेंट - निखिल, मधु, मोनिशा यांची आभारी आहे.2023 हे चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचे वर्ष ठरले आहे कारण MCVN सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून प्रचंड आदर आणि प्रेम मिळाले आहे. या चित्रपटानं खूप काही वेगळ्या गोष्टी नव्यानं शिकायला मिळाल्या. त्याचाही फायदा होतो आहे. अशा शब्दांत राणीनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply