ENG vs SL Super 8 Live Streaming : इंग्लंडसमोर श्रीलंकेचं आव्हान, सुपर 8 मध्ये कोण करणार विजयी सुरुवात?

सहयजमान श्रीलंका क्रिकेट टीम आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील दुसरा आणि एकूण 42 व्या सामन्यात इंग्लंडचा सामना करणार आहे. इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील पहिलाच सामना असणार आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर दासून शनाका याच्या खांद्यावर श्रीलंकेच्या कर्णधारपदाची धुरा आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीत बरोबरीची कामगिरी केलीय. दोन्ही संघांनी साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. अशात आता सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात कोणता संघ विजयी सलामी देण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना रविवारी 22 फेब्रुवारीला होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.

इंग्लंड आणि श्रीलंकेची साखळी फेरीतील कामगिरी

इंग्लंड आणि श्रीलंकेने साखळी फेरीत प्रत्येकी 3 सामने जिंकून 6 गुणांची कमाई केली. इंग्लंड पहिल्याच सामन्यात नेपाळकडून उलटफेरचा शिकार होण्यापासून वाचली. इंग्लंडने नेपाळ विरुद्ध 4 धावांनी निसटता विजय मिळवला. इंग्लंडने नेपाळ व्यतिरिक्त साखळी फेरीत स्कॉटलंड आणि इटलीवर मात केली. मात्र इंग्लंड वेस्ट इंडिज विरुद्ध विजय मिळवण्यात अपयशी ठरली.  विंडीजने इंग्लंडवर विजय मिळवला.

तर दुसऱ्या बाजूला सहयजमान असलेल्या श्रीलंकेला साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात उलटफेर स्वीकारावा लागला.  झिंबाब्वे टीमने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेला पराभवाचा झटका दिला.  तर श्रीलंकेने त्याआधी साखळी फेरीत आयर्लंड, ओमान आणि ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. आता श्रीलंका आणि इंग्लंडपैकी सुपर 8 मध्ये कोण विजयी सुरुवात करतं हे निकालानंतरच स्पष्ट होईल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *