Employee Strike : संपाचा फटका; ससून हॉस्पिटलचे डीन स्वतःच करतायत शस्त्रक्रिया

Employee Strike : राज्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सर्वच शासकीय, निमशासकीय कर्मचारी सध्या संपावर गेले आहेत. त्यामुळे रुग्णांचे तसंच नागरिकांचे हाल होत आहेत. अशात रुग्णांच्या सोयीसाठी आता पुण्यातल्या ससून रुग्ण्यालयाचे डीन स्वतःच शस्त्रक्रिया करत आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यभरातल्या रुग्णालयांप्रमाणेच पुण्यातल्या ससून रुग्णालयातल्या सेवेवरही ताण आला आहे. ससून हॉस्पिटल मध्ये ९९ टक्के नर्सेस संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता डीन डॉ. संजीव ठाकूर स्वतःच शस्त्रक्रिया करत आहेत.

कालच्या दिवसात छोट्या ३९ तर मोठ्या १३ शस्त्रक्रिया ससून हॉस्पिटल मध्ये पार पडल्या. जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी आज ही शासनातील कर्मचारी संपावर आहेत. सरकारी विभागांचे शेकडो अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. पुण्यातील ससून हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचा देखील संपात सहभागी आहेत.

ससून हॉस्पिटलमध्ये ९९ टक्के नर्सेस संपात सहभागी झाल्या आहेत. आज संध्याकाळ पर्यंत वाट बघणार आणि जर संप मागे घेऊन नर्सेस पुन्हा कामावर रुजू नाही झाले तर ७०० नर्सेस तात्पुरत्या सेवेसाठी बाहेरून मागवणार अशी माहिती ससून रुग्णालयाने दिली आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, महसूल, महानगरपालिका आदींसह शासनातील सुमारे ३२ विभागांचे अधिकारी-कर्मचारी कालपासून बेमुदत संपावर आहेत. त्याचा फटका राज्यभरातल्या शासकीय सेवांना बसत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply