EMM Negative : दुर्मिळ रक्तगट असणारा देशातला पहिला व्यक्ती गुजरातमध्ये आढळला

मुंबई : शरीरातील चार रक्तगट म्हणजेच ए, बी, ओ आणि एबी (Blood Groups) याबाबत सर्वांनाच माहित असेल. पण भारतातील डॉक्टरांना गुजरातमध्ये एक दुर्मिळ रक्तगट असलेली व्यक्ती आढळून आली आहे. EMM Negative असा हा दुर्मिळ रक्तगट असणारी व्यक्ती ही भारतातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे. ६५ वर्षाच्या या व्यक्तीला हृदयविकाराचा आजार आहे.

समर्पण रक्तदान केंद्रातील डॉक्टर सन्मुख जोशी यांनी दिलेली माहिती अशी की, गुजरातच्या राजकोट येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्या व्यक्तीला हृदयाच्या शस्त्रकियेसाठी अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या शस्त्रक्रियेसाठी त्या व्यक्तीला रक्त पुरवठ्याची गरज होती. मात्र अहमदाबाद येथे त्यांच्या रक्तगटाचे नमुने उपलब्ध नसल्याने सूरच्या रक्तरपेढीत नमुने पाठवण्यात आले.

दरम्यान, या व्यक्तीच्या रक्तगटाची चाचणी केल्यानंतर कोणत्याही रक्तगटाशी ते जुळत नव्हते. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी ते नमुने तपासणीसाठी अमेरिकेला पाठवले. त्यानंतर या व्यक्तीचा रक्तगट दुर्मिळ असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, जगातील फक्त दहा जणांच्या शरीरात ईममचे प्रमाण अधिक नसल्याचे समोर आले आहे. EMM चे प्रमाण कमी असल्याने या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. तसेच हा दुर्मिळ रक्तगट असल्याने या व्यक्ती इतरांना रक्तदान करू शकत नाही किंवा त्यांना इतर रक्तगट असलेल्या व्यक्ती रक्त देऊ शकत नाहीत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply