
Elon Musk : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे एकेकाळचे निकटवर्तीय तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले एलॉन मस्क यांच्यात सध्या जबरदस्त संघर्ष पाहायला मिळत आहे. दोघांनीही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांवर थेट आरोप करत त्यांच्या वैराला उघडपणे वाचा फोडली. मस्क यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी आपल्या एक्स पोस्टवर एक पब्लिक पोल शेअर केला आहे. त्यांनी या पोलमधून राजकीय पक्ष स्थापना करण्यासाठी जनतेकडून त्यांनी कौल घेतला आहे.
एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर शब्दांनी जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी ट्रम्प यांचे सत्तेतील वर्चस्व संपवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, स्वतःचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचा इशाराही दिला आहे. मस्क यांनी आपल्या 'एक्स' हँडलवर यासंदर्भात पोल देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत जनतेचा कौल मागितला.
या पोलचे निकाल जाहीर करताना मस्क म्हणाले, “८० टक्के लोकांनी पक्ष स्थापनेला पाठिंबा दर्शवला आहे. हेच आता घडले पाहिजे.” त्यांनी ‘द अमेरिका पार्टी’ या नावाने नवीन पक्षाची घोषणा करत पुढील राजकीय पाऊल उचलले आहे. त्यांच्या या घोषणेला सोशल मिडियावर मोठा प्रतिसाद मिळाल्याचेही समोर आले आहे.
मस्क यांनी एका आठवड्यापूर्वी ट्रम्प सरकारमधून आपला काढता पाय घेतला. त्यांनी राजीनामा दिला. तसेच त्यांनी अमेरिकन सरकारच्या बजेटवर टीका केली आहे. हे बजेट सामान्य जनतेला कर्जाच्या खाईत लोटणारे असल्याचा आरोप करत, त्यावर आपले मत विचारलेही गेले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मस्क यांनी असा दावाही केला आहे की, “जर मी ट्रम्प यांना मदत केली नसती, तर ते निश्चितच हरले असते.” त्यांनी ट्रम्प यांचे नाव ‘जेफ्री एपस्टाईन फाईल्स’ या अमेरिकेतील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलमध्ये असल्याचेही म्हटले आहे. त्यांच्या या आरोपांमुळे अमेरिकेसह अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे.
अमेरिकेच्या संविधानानुसार, कोणताही अध्यक्ष जास्तीत जास्त दोन कार्यकाळ म्हणजेच ८ वर्षांपर्यंतच सत्तेवर राहू शकतो. याअंतर्गत बराक ओबामा, जॉर्ज बुश यांच्यासारख्या नेत्यांनीही आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षपद सोडले होते. त्यामुळे तिसऱ्यांदा कोणालाही अध्यक्ष होता येत नाही. अमेरिकेतील पुढील राष्ट्रपती निवडणूक २०२८ मध्ये होणार आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

