Elon Musk: एलोन मस्क यांचा भारत दौरा पुढे ढकलला; महत्वाचं कारण आलं समोर

Elon Musk : टेल्सा कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांचा भारत दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे. साधारण मस्क २१ आणि २२ एप्रिल या दोन दिवसासाठी भारतात येणार होते. सीअनबीसी- टीवी१८ च्या सुत्रांनुसार शनिवार(२०एप्रिल)एलोन मस्कचा भारत दौरा पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे. मस्क यांचे भारतात येण्याचे मुख्य कारण हे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटीचे होते. या भेटीत टेस्लाच्या भारतीय बाजारपेठेतील प्रवेशाबद्दल बोलणार होते तसेच भविष्यात जाऊन भारतात टेस्ला प्लांट उभारण्याची चर्चा करण्याचीही त्यांची योजना होती.

परंतू, अद्याप मस्क यांनी भारत दौरा का पुढे ढकलला याबाबत कोणतेहा कारणे समजू शकली नाही. सू्त्रांच्या माहितीनुसार,भारत दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा मस्क यांना २३ एप्रिल रोजी अमेरिकेतील टेस्लाच्या पहिल्या तीन महिन्यातील कामगिरीबाबत सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.जर मस्क हे २१ आणि २२ एप्रिलला भारतात आले तर त्यांना २३ एप्रिल रोजी होणाऱ्या महत्त्वपूर्ण कॉन्फरन्स कॉलमध्ये भाग होणे मुश्किल झाले असते. याच कारणामुळे भारत दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे समजत आहे.

Buldhana News : धक्कादायक! PM मोदींच्या सभास्थळी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; ट्रेनखाली संपवले आयुष्य

सीईओ एलोन मस्क यांनी पंतप्रधान मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती

१० एप्रिल रोजी एलोन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती की ज्यात एलोन मस्क यांना पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे. यानंतर काही दिवसांनी मस्क भारत दौऱ्यावर येणार होते. मस्क अशा वेळी भारतात येणार होते त्यावेळेस सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन उत्पादन धोरण अधिसूचित केले आहे. या धोरणा अंतर्गत भारत सरकारच्या महत्वपू्र्ण प्रकल्पापैंकी एक असणारा 'मेक इन इंडिया'. या उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिक कार कंपन्यांना सवलत दिली जाऊ शकते.

मस्कची यांची भारतात तब्बल ३० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना

सूत्रांनुसार पहिल्यांदा सांगण्यात आले होते की, एलोन मस्क पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या दरम्यान भारतात २० ते ३० अब्ज डॉलर गुंतवणुकीसंदर्भात रोडमॅप सादर करणार होते. मात्र, मस्क यांच्या भेटीदरम्यान स्टारलिंक संदर्भात कोणतीही करार होणार नसल्याचेही सांगण्यात आले. गेल्या वर्षीच्या जूनमध्ये जेव्हा पीएम मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी त्यांची भेट एलोन मस्क यांच्यासोबत झाली होती. तेव्हा भारतीय बाजारपेठेतही उतरायचे आहे, असे त्यांनी त्यावेळी पंतप्रधानांना सांगितले होते.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply