Election Commission on NCP : शरद पवार गटाचं नवं नाव आणि चिन्ह ठरलं, सूत्रांची माहिती

Election Commission on NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह  अजित पवार यांचंच असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाचा निकाल शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह शरद पवार गटाला वापरता येणार नाही. नवीन नाव आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाला निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार आहे.

नवीन नाव आणि चिन्ह याबाबत शरद पवार गटाला आज संध्याकाळपर्यंत कळवायचं आहे. शरद पवार गटाने आपलं नाव आणि चिन्ह ठरवलं असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे. 

NCP Party And Symbol : शरद पवार यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे; निवडणूक आयोगाचा निर्णय

काय असेल नाव आणि चिन्ह?

सूत्रांच्या माहितीनुसार, 'मी राष्ट्रवादी पार्टी' हे नाव आणि 'उगवता सूर्य' हे चिन्ह मिळावं अशी मागणी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात केली जाऊ शकते. शरद पवार  गटाने चार चिन्ह निश्चित केल्याची देखील माहिती मिळत आहे. 

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवार असल्याचं ट्वीट निवडणूक आयोगाच्या निकालानंतर केलं आहे.

येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ३ नावे आणि ३ चिन्हे सादर करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला केल्या आहेत. आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ही नावे आणि चिन्ह सादर करावी लागणार आहे. आज दिलेल्या वेळेत नाव आणि चिन्हांची यादी शरद पवार गटाने सादर न केल्यास त्यांना अपक्ष म्हणून मान्यता मिळेल.

निवडणूक आयोगाच्या निकालात काय म्हटलंय?

निवडणूक आयोगाने अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवारांनाच राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह वापरता येणार आहे. शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply