Eknath Shinde Resign : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा, राजभवनावर हालचालींना वेग

Eknath Shinde Resign  : राज्यात विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आता नवीन सरकार स्थापन करावे लागणार आहे. आज, २६ नोव्हेंबर रोजी सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. एकनाथ शिंदे यांनी सकाळी ११ वाजता राजभवानावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा दिलाय. पुढील विधेनसभेच्या मुख्यमंत्र्‍यांचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार -

तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेपर्यंत एकनाथ शिंदे ं काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. जुनी विधानसभा बरखास्त होत असून तांत्रिकदृष्ट्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा देणे अपेक्षित होतं. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला.

Nagpur Accident : नागपूरमध्ये भीषण अपघात, ५२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली

नव्या सरकारचा शपथविधी कधी? Maharashtra news CM

महायुतीचे सरकार स्पष्ट झालेय. सूत्रांच्या माहितीनुसार, २ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. देवेंद्र फडणवीस यांना १७८ आमदारांचा पाठिंबा असल्याचं समजतेय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील,असे बोलले जातेय.

काही आमदारही घेणार शपथ -

मुख्यमंत्र्यांसोबत काही आमदार शपथ घेणार असल्याचे समजतेय. २० आमदार शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजपचे दहा आमदार , अजितपवार गटातील पाच आमदार तर शिंदे गटातील पाच आमदार असे आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply