Eknath Shinde on Khalapur Landslide : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Khalapur Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीत मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून एकूण ७५ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.

यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. तसेच मदतकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी दिली.

रायगड दुर्घटनेबाबत बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, इर्शाळवाडी येथे 45 घरं आहेत, यातील 15 ते 17 घरं ढिगाऱ्याखाली दबले आहेत. आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. इतर लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Khalapur Landslide : रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली; बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

एनडीआरएफ, एसडीआरएफसह लोकल रेस्क्यू टीम बचावकार्य करत आहे. पाऊस सुरू आहे. तिथे वाहनं देखील जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. सर्व यंत्रणा आणि लोक बचाव कार्यात गुंतले आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांचाही फोन आला होता, त्यांनी देखील जी मदत लागेल ती केंद्रसरकारकडून केली जाईल असे सांगितले आहे. दोन हेलिकॉप्टर तयार आहेत, परंतु खराब हवामानामुळे ते टेक ऑप करू शकत नाहीये, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply